मराठी साहित्य व कला

मराठी साहित्य प्रसार

विवेकी समाजासाठी साहित्य आणि कला

माणसाला निसर्गाकडून ज्या गोष्टी मिळतात, त्यावर माणूस आपल्या सृजनशीलतेच्या सहाय्याने प्रक्रिया, संस्कार करतो. या संस्कारांमधून निर्माण होणारे विचार, चालीरीती, पद्धती म्हणजेच माणसाची संस्कृती. प्रत्‍येक व्‍यक्‍तीची संस्‍कृती ही दुसर्‍या व्‍यक्‍तीच्‍या संस्‍कृतीहून काही प्रमाणात का होईना वेगळी आणि स्‍वतंत्र असते. संस्कृती ही अनेक वर्षांच्या प्रक्रियेनंतर तयार होते. त्यामुळे समान भूभाग, निसर्ग असलेल्या व्यक्तींची संस्कृती सारखी असते. माणसाच्या भावविश्वाचा पाया असते ती संस्कृती. आणि या संस्कृतीला पाया असतो तो म्हणजे साहित्य आणि कला आविष्कार.

समाजात असलेल्या कला, साहित्य, चित्रपट किंवा कोणतेही इतर कला प्रकार घ्या; ते माणसाच्या भावविश्वाचा आरसा असतात. हे कलाप्रकार समाजाचं मन तयार करतात, प्रेरणा जागृत ठेवतात. समाजाचे संस्कार आणि शहाणपण तपासत राहतात. आपला मराठी समाज जर सर्जनशील आणि विवेकी घडावा असं वाटत असेल तर विविध कला आणि साहित्य यांकडे विशेष लक्ष पुरवणे आपल्याला गरजेचे आहे. हे काम केवळ सरकारी अनुदान देऊन होणारे नाही. हा विचार प्रत्येक मराठी मनामध्ये रुजायला हवा. तरच आपण विवेकी समाजाकडे वाटचाल करू शकू.

प्रश्नाचं स्वरूप


या विषयाकडे बघताना अनेक साहित्य आणि कला प्रकार डोळ्यासमोर येतात. यामध्ये साहित्य, नाटक, चित्रपट, नृत्य, संगीत, शिल्पकला आणि इतर लोककलांचा समावेश होतो.

संगीत

महाराष्ट्रामधली शास्त्रीय गायकी म्हटली की पंडित भीमसेन जोशींच नाव सर्वात आधी येतं. राग-संगीतात ख्याल, ठुमरी, भावसंगीत, लावणी अशा असंख्य प्रकारांचा समावेश होतो. यामध्ये पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर व पं. विष्णु दिगंबर पलुस्कर यांची नावे अग्रक्रमाने येतात. किराणा घराण्यातील सवाई गंधर्व, बाळकृष्णबुवा कपिलेश्र्वरी, हिराबाई बडोदेकर, सरस्वती राणे, सुरेशबाबू माने, गंगुबाई हनगल, पंडित भीमसेन जोशी, बसवराज राजगुरू, संगमेश्वर गुरव, पं. फिरोझ दस्तुर, प्रभा अत्रे असे अनेक दिग्गज कलाकार त्यांच्या स्वरगुंजनाने आणि आवाजातील जादूने आपल्याला मंत्रमुग्ध करीत आले आहेत. असे अनेक नाट्यसंगीतातले आणि शास्त्रीय संगीतातले दिग्गज आहेत ज्यांची नावे घेता येऊ शकतील.

राग-संगीताच्या परंपरेत महाराष्ट्राने भरीव कामगिरी केली आहे आणि मोलाची भर टाकली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्र बहुतेक बाबतीत नेहमीच सर्वमावेशक राहिलेला आहे. संगीत-कलाकारासाठी रसिक आणि धनिक यांनी महाराष्ट्रात उदार परंतु विलक्षण असे धोरण ठेवलेले आहे. कोणत्याही नवीन सौंदर्यप्रणालीचे स्वागत आपल्या विलक्षण बुद्धीला साक्ष ठेवून महाराष्ट्र आजवर अतिशय साक्षेपाने आणि उदारमतवादी धोरणाने करत राहिलेला आहे. त्यामुळे कलाकार बाहेरून शिकून आले किंवा महाराष्ट्राबाहेरचे असले, तरी त्यांच्या कलेचे संवर्धन आणि जतन-बर्या्च प्रमाणात मुंबई, पुणे, कोल्हापूर, मिरज इत्यादी ठिकाणांहून होत आले आहे. यात असंख्य गायक-वादक, समीक्षक, लेखक, संस्था यांचा सहभाग आहे. महाराष्ट्राला संगीताचा जरी भक्कम वारसा असला तरी त्यामध्ये नवीन प्रयोग होताना दिसत नाहीत. तसेच शुद्ध गाणं ऐकण्यासाठी रसिक अजून तयारी दाखवत नाहीत. कोणीतरी कार्यक्रम फुकट लावला आणि आपण जाऊन तो ऐकावा ही खरी रसिकता नाही. रसिकांना चांगल्या कला अविष्कारांसाठी पैसा आणि वेळ खर्च करावा लागतो, अशी सवय व्हायला हवी.

नाटक

'नाटक' हा वाङ्मयप्रकार म्हणजे भारतीय संस्कृतीचे अत्यंत उज्ज्वल आणि भूषणावह असे अंग समजले जाते. इ.स. १८४३ मध्ये विष्णुदास भावे यांच्या 'सीतास्वयंवर' या पहिल्या मराठी नाटकाचा प्रयोग झाला. त्यानंतर मराठी नाट्यकलेला आत्मविश्र्वासाने आणि कलापूर्ण रीतीने उभे राहाण्यास तब्बल तीन तपे जावी लागली. विष्णुदास भावे यांना सांगली परिसरातून केलेल्या `पहिल्या' प्रयत्नांमुळे `मराठी नाटकाचे जनक' म्हटले जाते. त्यानंतर अनेक नाट्यलेखकांनी ह्या कलाप्रकार वाढवायला हातभार लावला आहे. महाराष्ट्रातल्या नाट्य परंपरेमुळे भारताला अनेक नट लाभले आहेत.

आज नाट्यक्षेत्रातल्या दिग्गजांना भेटलो तर ते या क्षेत्रातल्या अनेक समस्या सांगतात. चांगली नाट्यगृहे नसणे ही त्यातलीच एक समस्या. महाराष्ट्रामधल्या अनेक भागांमध्ये नाटक पाहायला लोक गर्दी करत आहेत. पण नाटकांची प्रत्यक्ष निर्मिती होते ती केवळ काही ठराविक शहरांमध्ये.

चित्रपट

महाराष्ट्र हे सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध व संपन्न असे राज्य! अनेक कलांपैकी चित्रपट या क्षेत्राशी संबंधित आधुनिक कला महाराष्ट्रातच निर्माण झाल्या, जोपासल्या गेल्या व समृद्ध झाल्या. सुमारे १०० वर्षांहून अधिक काळ लोटलेल्या मराठी चित्रपटसृष्टीला कलेचा देदिप्यमान असा वारसा आहे. अनेक कला व कलाकारांनी समृद्ध असलेल्या महाराष्ट्रामध्येच चित्रपटसृष्टीची निर्मिती व्हावी, हे अहोभाग्य मराठी माणसाला मिळावे यामागे अनेकांचे अथक परिश्रम, संशोधन, कलासक्त मन हे होते. या समृद्ध आणि संपन्न परंपरेचा स्तर कायम ठेवत पुढील काळात - आत्तापर्यंत - चित्रपट क्षेत्रातील कलाकारांनी मराठी चित्रपटांची आणि महाराष्ट्राची शान कायमच वाढवत नेली आहे. महाराष्ट्रली चित्रपट सृष्टी श्री. महादेव गोपाळ पटवर्धन, दादासाहेब फाळके, बाबुराव पेंटर, व्ही. शांताराम, प्रभात कंपनी, भालजी पेंढारकर, राजा परांजपे या नावांखेरीज पूर्ण होणार नाही. लता मंगेशकर, आशा भोसले आणि हृदयनाथ मंगेशकरांनी आपल्या संगीताने चित्रपटसृष्टी गाजवली.

आज मराठी चित्रपटांमध्ये अनेक नवीन प्रयोग होताना दिसत आहेत. पण तमिळ, तेलगु किंवा बंगाली चित्रपटसृष्टीपेक्षा मराठी चित्रपट अजूनही मागे आहे.

चित्रकला आणि शिल्पकला

महाराष्ट्राला कायमच अस्थिर राजकारणाचा इतिहास होता. सतराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी एक स्थिर अशी राजवट निर्माण केली. त्यांनी व त्यानंतर आलेल्या पेशवे, राजर्षी शाहू महाराज या सत्ताधीशांनी चित्रकला, शिल्पकला यांना प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली.

चांगले शिक्षक, कलादालने यांचा आज अभाव आहे. आज चित्रकला आणि शिल्पकला या कला प्रकारांसाठी खूप काही करता येण्याजोगे आहे. यामध्ये

साहित्य

मराठी साहित्य म्हणजे मराठी कथा, कादंबरी, काव्य आणि कविता. १८५७ साली बाबा पद्मनजी यांनी लिहिलेली 'यमुनापर्यटन' ही मराठीतलीच नव्हे तर भारतातली सर्वात पाहिली कादंबरी समजली जाते. या कादंबरीमध्ये तत्कालीन विधवांच्या प्रश्नावर भाष्य केले आहे. पहिल्याच कादंबरीपासून मराठी साहित्यामध्ये कृतीप्रधानता दिसते. बाबा पद्मनजी नंतर हरी नारायण आपटे, वामन मल्हार जोशी, साने गुरुजी, विभावरी शिरुरकर, भाऊ पाध्ये, अनंत कदम, दिनानाथ मनोहर इत्यादी लेखकांनी ही परंपरा पुढे समर्थपणे चालवली आणि समृद्ध केली.

नंतरच्या काळात ना.सी फडके, वि.स. खांडेकर, पु.ल. देशपांडे या लेखकांबद्दल मराठी वाचकांना वेगळे सांगायची गरजही नाही. या नंतर भालचंद्र नेमाडे यांनी बदलत्या समाजाचं चित्र रेखाटायला सुरवात केली. १९८० नंतर गौरी देशपांडे, सानिया, आशा बगे यांच्या कादंबर्यांममधून बदलत्या स्त्रीजीवनाचे चित्रण केलेले दिसते.

सध्याच्या काळात आपल्यावर माध्यमांचा सतत मारा होतो आहे. एकूणच वाचन कमी होतं आहे, आणि मुख्यत: मराठी वाचक कमी होतो आहे. या पार्श्वभूमीवर मराठी माणसांना मराठी समाजाशी, बदलत्या मराठी संस्कृतीशी नातं भक्कम करण्यासाठी साहित्य प्रकार नक्कीच उपयोगी ठरेल. पण, समृद्ध साहित्य निर्मिती व्हावी यासाठी कोणत्याच माध्यमांमधून प्रयत्न होताना दिसत नाहीत.

महाराष्ट्रात उगम पावलेल्या, वसलेल्या, वाढलेल्या अनेक लोककला हळू हळू लयाला जातील अशी भीती वाटते आहे. या लोककला, म्हणजे महाराष्ट्राने जतन केलेले मौल्यवान ऐश्वर्य आहे. मनोरंजनासाठी आणि त्याबरोबरच प्रबोधनासाठी त्यांचा जन्म झाला. आर्थिक आणि शैक्षणिकदृष्टया कमकुवत समाजाला जेंव्हा शिक्षणाचा आधार नव्हता तेंव्हा या लोककला आपला आधार बनल्या. म्हणून या लोककला मराठी माणसाचा सांस्कृतीक ठेवा आहेत.

महाराष्ट्रात, मराठी समाजात होऊन गेलेले थोर संत, विचारवंत, प्रबोधनकार, सामाजिक शास्त्रज्ञ यांची दैदीप्यमान विचारसंपदा, संशोधन, ज्ञानसाधना यांची आठवण सांगणारे असे आज राज्यात एकही दर्जेदार संग्रहालय नाही.

मराठी साहित्य, संगीत, चित्रपट, नाट्य, चित्रकला, शिल्पकला,लोककला व इतर अनेक कलांमधून मराठी मनाचे चित्रण आपल्याला दिसते. हे सर्व कलाप्रकार आजपर्यंत महाराष्ट्राने फुलवल्या, जोपासल्या. त्या पडद्याआड न जाता मराठी मन आणि समाज घडवण्याचे काम त्यांनी इथून पुढेही अत्यंत समर्थपणे करत राहिले पाहिजे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.

असं का होतं?


आजवर मराठी संस्कृतीच्या संवर्धनाकडे शासनाचे व लोकांचे देखील दुर्लक्षच झाले आहे. आपण जगातील सगळ्या देशांतील संग्रहालये ढुंढाळतो व त्यांच्या महान कलाकार, तत्ववेत्यांचे गोडवे गातो, पण आपल्या इथल्या संतपरंपरा, संतकाव्य यांमध्ये सांगितलेले शाश्वत ज्ञान समजून घ्यायला आपल्याला सवड नाही. आपल्याकडच्या कलांकडे लक्ष द्यायला आपल्याकडे वेळ नाही. आपल्याला आपल्याकडे असलेल्या कला, साहित्याबद्दल 'अतिपरिचयात अवज्ञा' असं तर झालं नाही ना, हे तपासून पहायला हवं.

काय करायला हवं?


जागरुकतेबरोबरच नवीन लेखकांना, कवींना, साहित्यकारांना, कलाकारांना नवीन साहित्य आणि कलेच्या निर्मितीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्राने विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. शासन व्यवस्थेने कलाकारांना कलानिर्मितीसाठी अवकाश उपलब्ध करून देण्याची गरज आहे. कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी कला निकेतने, कलेच्या शिक्षणासाठी संस्था आणि त्यामध्ये चिकित्सकांना ही वाव दिला पाहिजे. यासाठी शासन सुरवातीला मदत करेल, पण त्यानंतर कला चिकित्सकांनी, रसिकांनी हा प्रयोग पुढे नेला पाहिजे.

मराठी भाषेच्या जवळजवळ ४० बोली भाषा आहेत. या बोलीभाषांमधील साहित्य निर्मितीसाठी विशेष कार्यक्रम आखला गेला पाहिजे. बाल साहित्याला प्रोत्साहन दिले पाहिजे. शाळांमधून कलेबद्दल केवळ पुस्तकी ज्ञान न देता अनुभव देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. मुलांना प्रयोगशील राहण्यासाठी प्रोत्साहन दिले गेले पाहिजे.

चित्रपट, नाटक यांसारख्या कलांना योग्य प्रेक्षक मिळणं हे ती कला वाढण्यासाठी महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे जसे आपण विविध नाट्यसंस्था, नाट्य शिबिरे यांना प्रोत्साहन देणं आवश्यक आहे, तसेच, चांगले प्रेक्षक घडविण्यासाठी वेगवेगळ्या कलांसाठी रसग्रहण कार्यक्रम, शिबिरेही आयोजित करायला हवीत.

मराठी कला आणि पर्यटन यांचं एकत्रितपणे विचार केला गेला पाहिजे पाहिजे. या दोन गोष्टी एकमेकांना पूरक अशा आहेत. कलादालने, शिबिरे इत्यादी गोष्टींची सुरवात झाली तर त्यातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल ही गोष्ट वेगळीच.

महत्वाच्या कल्पना


 • महाराष्ट्रातल्या विविध बोली भाषांमधून साहित्य निर्मितीला प्रोत्साहन
 • जगभरातल्या देशांमध्ये मराठी श्रेष्ठ कला-साहित्य अभ्यास-संधोधन केंद्रे.
 • बालसाहित्याकडे विशेष लक्ष.
 • चित्रपट, नाटक, चित्रकला अशा कालाप्रकारांसाठी रसग्रहण शिबिरे
 • राज्याच्या ३५ जिल्ह्यांपैकी प्रत्येक जिल्ह्यात तेथील भौगोलिक व मराठी इतिहासाची, संस्कृतीची वैशिष्ट्य सांगणारे 'संस्कृती मंदीर'
 • इंदू मिल परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक – जगानं आश्चर्य करावं अशा एका अतिभव्य ग्रंथालयाची योजना
 • मराठी आणि हिंदी चित्रपटांना फक्त पोलिस परवानगीवर महाराष्ट्रात कुठेही चित्रीकरण शक्य
 • राज्याच्या प्रत्येक जिल्ह्याचे स्वतःचे स्थानिक परंतु जागतिक दर्जाचे वैशिष्ट्यपूर्ण कला-प्रदर्शन संग्रहालय.
 • महाराष्ट्रात चित्रपट चळवळ

कार्यक्रम


महाराष्ट्र शासनाने २०१० साली 'महाराष्ट्र राज्य सांस्कृतीक धोरण' अस्तित्वात आणले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भूमिकेचा हा विजयचं मानावा लागेल. या धोरणामध्ये अनेक मुलभूत कार्यक्रम सुचवले गेले आहेत.

या धोरणामधल्या पुढील काही कार्यक्रमांचं आम्ही स्वागत करतो आहोत-

मराठी भाषा आणि साहित्य

 • अर्थसंकल्पातील ४% रक्कम सांस्कृतीक क्षेत्रासाठी

 • सांस्कृतिक क्षेत्रातील योजनांसाठी दरवर्षी अर्थसंकल्पाच्या चार टक्के रक्कम राखून ठेवण्यात यावी. राज्य शासनाच्या आधीपासून कार्यान्वित असलेल्या सांस्कृतिक उपक्रमांसाठी आणि धोरणात नमूद करण्यात आलेल्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी ही रक्कम उपयोगात आणली जाईल.

 • राज्य सांस्कृतिक निधी

 • अर्थसंकल्पातील तरतुदीच्या जोडीने राज्य शासनाचा स्वतंत्र असा एक 'राज्य सांस्कृतिक निधी' स्थापन करण्यात यावा. हा निधी उभारण्यासाठी शासकीय अर्थसाहाय्याच्या जोडीने लोकसहभागाचाही आधार घेण्यात यावा. यामुळे लोकांच्या सर्जनशीलतेला वाव मिळेल आणि त्यांना सांस्कृतिक क्षेत्राला योगदान देण्याची संधी लाभेल. असा निधी उभारण्यासाठी अनेक समाज घटकांना एकत्र आणता येईल. एरवी केवळ शासकीय तरतुदींमधून सहजरीत्या राबविता न येणार्‍या योजना आणि उपक्रम या निधीतून राबविले जातील.

 • सांस्कृतिक संस्था - स्वावलंबनातून विकास

 • शासकीय अनुदान घेणार्या- संस्‍थांनी आपले कार्य आणि विश्व्सनीयता यांच्याक जोरावर उत्पयन्नााचे शासकीय अनुदानाखेरीज अन्य स्रोत निर्माण करावेत आणि शक्यक तितके स्वा‍वलंबी होऊन आपल्यात संस्थां्चा विकास करावा, अशी सूचना संबंधित संस्थांरना करण्याणत यावी.

 • महाराष्ट्र विद्या

 • प्राच्यविद्या (ओरिएंटॉलॉजी) आणि भारतविद्या (इंडॉलॉजी) यांच्या धर्तीवर 'महाराष्ट्रब विद्या' (महाराष्ट्र स्टडीज) अशी एक ज्ञानशाखा विकसित होताना दिसते आहे. त्याीसाठी 'महाराष्ट्रफ प्रगत अध्यायन केंद्र' या नावाची एक स्वायत्त संस्था स्थानपन करण्याकत यावी. या केंद्रात महाराष्ट्रबविषयक सर्वांगीण अध्ययनाबरोबरच इतर राज्यांवशी असलेल्याथ महाराष्ट्रासच्या‍ संबंधांचे संशोधन, अभ्यास इत्यादी करण्यारचीही व्यबवस्थार असेल. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत याविषयाची कार्यवाही करण्यात यावी.

 • मराठी बोली अकादमी

 • राज्याच्या वेगवेगळ्या भागांत मराठीच्या विविध बोली बोलल्या जातात. या बोलींचे अध्ययन, अध्यापन, संशोधन, कोशनिर्मिती, साहित्यनिर्मिती तसेच या बोलींतून होणार्या. कलांच्या सादरीकरणाचे संवर्धन इत्यादींसाठी एक स्वतंत्र 'मराठी बोली अकादमी' स्थापन करण्यात यावी. काही बोली या परप्रांतीय किंवा परकीय भाषांच्या प्रभावातूनही तयार झालेल्या आहेत. अशा बोलींविषयींचे प्रकल्पही या अकादमीमार्फत राबविण्यात यावेत. पहिल्या वर्षी अकादमीसाठी रू. दहा कोटी राखून ठेवण्यात यावेत. या रकमेच्या व्याजातून अकादमी काम करील. त्याशिवाय आवश्यकतेनुसार आवर्ती खर्चासाठी शासन दरवर्षी काही रक्कम अनुदान म्हणून देऊ शकेल.

कला

 • कलासंकुल

 • प्रयोगात्म व दृश्यात्मक कलांच्या संवर्धनासाठी विभागीय पातळीवर प्रत्येक महसुली विभागात 'कलासंकुल' उभारण्यात यावेत. या संकुलांमध्ये नाटक, संगीत, नृत्य, चित्रकला, शिल्पकला, छायाचित्रकला, लोककला, आदिवासी लोककला, हस्तकला इत्यादींसाठी प्रशिक्षण, तालीम आणि सादरीकरण यासाठी सोयी असाव्यात. या सोयी कलाकार आणि सांस्कृतिक संस्था यांना भाडेतत्त्वावर उपलब्ध असाव्यात. अशी संकुले उभारण्यासाठी शासन प्रत्येक विभागीय महसूल आयुक्तालयाला निधी उपलब्ध करून देईल.

 • खुले नाट्यगृह

 • प्रत्येक तालुक्यात एक खुले नाट्यगृह (ऍम्फी थिएटर) आणि जिल्हा पातळीवर एक छोटेखानी, सुमारे ३५० ते ५०० आसनक्षमतेचे नाट्यगृह खाजगी सहभागाने बांधण्यात येईल. ते मुख्यत्वे सांस्कृतिक उपक्रमांसाठी वापरले जाईल.

 • ललित कला अकादमी

 • केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यात दृश्यात्मक कलेसाठी कार्य करणार्याय संस्थेची गरज लक्षात घेऊन, महाराष्ट्र ललित कला अकादमी स्थापन करण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला आहे. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याात यावी. अकादमीच्या अंतर्गत सुयोग्य ठिकाणी कलाग्राम स्थायपन करण्‍यात यावे. त्याबमध्येन पुढील सुविधा असतील- धातू ओतशाळा (मेटल फाउंड्री), ग्राफिक्सा स्टु‍डिओ, सिरॅमिक फाउंड्री, प्रदर्शनासाठी कलादालन, कार्यशाळा (वर्कशॉप शेड), भाडेतत्त्वावर आवश्यक तितके स्टुगडिओ, खुले नाट्यगृह (ऍम्फीस थिएटर), अतिथिगृह इत्यादी.

साहित्य

 • परदेशात अध्यासने

 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने कोलंबिया विद्यापीठात (अमेरिकेत) आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या नावाने ऑक्सफर्ड विद्यापीठात (ब्रिटनमध्ये) अध्यासन निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा. ही अध्यासने शासनाच्या आर्थिक सहभागाबरोबरच त्याठ दोन्ही देशांतील तसेच आपल्याा देशातील लोकांच्यार सहकार्यातून निर्माण करण्यालचे प्रयत्न करण्यात यावेत.

 • कार्यालये व विभाग हस्तांतरण

 • शासकीय कामकाजात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करण्यासाठी स्थापन करण्यात आलेले भाषा संचालनालय, मराठी भाषेच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेली राज्य मराठी विकास संस्था, उर्दू भाषेसाठी कार्य करणारी उर्दू अकादमी, तसेच महाराष्ट्राबाहेरील मराठी / बृहन्महाराष्ट्र मंडळे वा तत्सम संस्था यांना साहाय्य करणे हे विषय सध्या सामान्य प्रशासन विभागाचे आहेत. ग्रंथालय संचालनालय उच्च शिक्षण विभागाकडे आहे. तसेच, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्र साधनांसाठीच्या समित्याही याच विभागाकडे आहेत. लोकसाहित्य समिती शालेय शिक्षण विभागांतर्गत येते. या सर्व विषयांचा सांस्कृतिक कार्य विभागाशी जास्त जवळचा संबंध आहे. याकरिता हे सर्व विषय यापुढे पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे असावेत. तसेच, दृश्यात्मक कलांच्याब शिक्षणाविषयीचा भाग उच्च शिक्षण विभागाकडे ठेवून त्या कलांविषयींच्या अन्य बाबी कला संचालनालयाकडे असाव्यात आणि कला संचालनालय हे पर्यटन व सांस्कृंतिक कार्य विभागाकडे हस्तांतरित करण्यात याव्यात. दृश्यात्मक कलाविषयक संवर्धन, प्रशिक्षण, जतन, संस्थांना अनुदान, वयोवृद्ध कलाकार मानधन, पारितोषिके, प्रदर्शने, जीवन गौरव व अन्य पुरस्कार इत्यादी अन्य योजनांसाठी कला संचालनालय कार्य करील. उपरोक्त सर्व विषय व कार्यालये आर्थिक तरतूद व मंत्रालयीन प्रशासकीय यंत्रणेसह पर्यटन व सांस्कृतिक विभागाकडे वर्ग करण्यात येतील.

 • सांस्कृतिक समन्वय समिती

 • साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रासाठी कार्य करणार्याव राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या विविध समित्या, मंडळे, महामंडळे, संचालनालये यांच्या कार्यात एकवाक्यता आणि समन्वय असावा, यासाठी या संस्था आणि कार्यालये यांच्या प्रमुखांची पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत 'राज्य सांस्कृतिक समन्वय समिती' स्थापन करण्यात येईल. या समितीची दर तीन महिन्यांतून एकदा बैठक घेण्यात येईल. या बैठकीत त्या संस्थांचे सुरू असलेले उपक्रम, प्रस्तावित उपक्रम, प्राधान्यक्रम इ. बाबत चर्चा होईल आणि माहितीची देवाण-घेवाण करण्यात येईल. तसेच झालेल्याप कामांचा आढावा घेण्याात येईल. ही समिती समन्वयाच्या दृष्टीने आवश्यक ते निर्णय घेईल.

 • दुर्मिळ ग्रंथ सूची

 • महाराष्ट्रात शंभर वर्षांपूर्वी स्थापन झालेली सुमारे सव्वाशे ग्रंथालये आहेत. या ग्रंथालयांमध्ये आणि इतरही काही ग्रंथालयांमध्ये १ जानेवारी १९०१ पूर्वी प्रकाशित झालेली अनेक पुस्तके आहेत. या ग्रंथालयांकडे / व्यक्तिगत संग्रहांमध्ये असलेल्या अशा पुस्तकांचे तपशील मागवून घेण्यात येतील. महाराष्ट्राच्या बाहेर मराठी भाषकांनी उभारलेली ग्रंथालये व इतर संस्था यांच्याकडे अशी पुस्तके उपलब्ध असतील, तर त्यांचाही तपशील मागवून घेण्यात येईल. ग्रंथालय संचालनालयामार्फत अशा ग्रंथांची सूची संशोधकांसाठी प्रसिद्ध करण्यात यावा.

 • दुर्मिळ मराठी ग्रंथ संकेतस्थचळावर

 • स्वाूमित्व् अधिकाराची मुदत संपलेले अनेक मराठी ग्रंथ सध्याक उपलब्धच होत नाहीत. अशा दुर्मिळ आणि महत्त्वाच्या ग्रंथांची सूची महाराष्ट्रर राज्यन साहित्यं आणि संस्कृठती मंडळामार्फत तयार करण्याशत येईल. हे ग्रंथ स्व्तंत्र संकेतस्थसळावर सहज उपलब्धा होतील, अशी व्ययवस्थाल करण्यातत यावी.

 • ग्रंथसंस्कृती जोपासना

 • राज्यात ग्रंथसंस्कृतती वृद्धिंगत करण्यारचे प्रयत्नक केले जावेत. यासाठी-

  a. महिन्यातून एकदोनदा एकत्र जमून ग्रंथचर्चा, ग्रंथसमीक्षण, साहित्यविषयक चर्चा इ. उपक्रम राबविणार्याू संस्थांृना राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फत प्रोत्साहन देण्याकत यावे. राज्याात अशा संस्थांृचे एक जाळेच निर्माण व्हाकवे, असे प्रयत्नी केले जावेत.

  b. मराठीपेक्षा वेगळी मातृभाषा असलेल्या देशी / परदेशी लेखकांनी / संशोधकांनी मराठीत किंवा महाराष्ट्रविषयक लिहिलेल्या उत्कृष्ट ग्रंथांना वाङ्मय पुरस्कार देण्यात यावेत.

 • मराठी ग्रंथ अनुवाद प्रोत्साहन

 • a. मराठीतील उत्तम साहित्यकृती अन्य भारतीय भाषांमध्ये विशेषत: हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये अनुवादित होण्यासाठी उपक्रम राबविण्यात यावा.

  b. महाराष्ट्रातील संतांच्या निवडक वचनांचे अनुवाद देशातील भाषांमध्ये, तसेच परदेशांतील काही महत्त्वाच्या भाषांमध्ये प्रकाशित करण्यात यावा.

संग्रहालये

 • जिल्हा / तालुका वस्तुसंग्रहालये

सांस्कृतिक महत्त्व असलेल्या परंतु विस्मृतीत चाललेल्या वस्तू उत्खनन वगैरे करताना सार्वजनिक ठिकाणी प्राप्त झाल्यास किंवा कोणा व्यक्तींनी उपलब्ध करून दिल्यास त्या वस्तूंची संग्रहालये त्या परिसरातच जिल्हा / तालुका पातळीवर उभी करण्यात यावीत. या वस्तू त्या परिसरातून अन्यत्र नेण्यास परवानगी असणार नाही. अशी संग्रहालये उभी करण्यास या क्षेत्रात कार्य करणार्यार संस्थांना पुरातत्त्व संचालनालयामार्फत प्रोत्साहन देण्यात यावे.

या बरोबरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही शिफारशी

महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्याच्या साहित्य-कला परंपरेचा अभ्यास करून खालील उपक्रम हाती घेतले जातील, व त्या आधारित साहित्य-कला संग्रहालये बांधली जातील. जी त्या त्या जिल्ह्यांतील कला-साहित्य संस्कृती बद्दल माहिती देणारी जागतिक दर्जाची संग्रहालये असतील.

 • प्रत्येक जिल्ह्यामध्ये अभ्यास मंडळे नेमून तेथील परंपरेचा अभ्यास करण्याचा उपक्रम हाती घेता येतील

विविध जिल्ह्यांमधल्या संस्कृती-मंदिरांचे विषय -

 • भिल्ल संस्कृती दर्शन संग्रहालय धुळ्यामध्ये
 • कोरकू संस्कृती दर्शन संग्रहालय धारणीला
 • अहिराणी संस्कृती दर्शन संग्रहालय - नंदुरबारला
 • मालवणी संस्कृती दर्शन संग्रहालय मालवणला
 • कातकरी संस्कृती संग्रहालय कर्जतला
 • गोंड संस्कृती संग्रहालय गढचिरोलीला
 • कोलाम संस्कृती संग्रहालय पांढरकवड्याला (यवतमाळ)
 • संत-साहित्य संग्रहालय आळंदीला
 • मराठी पैठणी, हस्तकला संग्रहालय पैठणला
 • मराठी शस्त्रसंग्रहालय सातारा
 • मराठी शिल्पकला संग्रहालय अहमदनगरला
 • मराठी हस्तकला, कोल्हापूरी चपला संग्रहालय कोल्हापूरला

या संग्रहालय / संस्कृती मंदिरांमध्ये खालील गोष्टी असतील -

 • त्या त्या जिल्ह्यांतील गोष्टीचा चित्रमय इतिहास, त्याचा विकास कसा कसा झाला याच्या प्रतिकृती
 • वस्तु-संग्रहालयात प्रशिक्षित कार्यकर्ते, त्यांना विविध भारतीय आणि जागतिक भाषांचे प्रशिक्षण,
 • माहिती पुस्तिका
 • दर दोन तासाला स्लाइड शो
 • तिथल्या शाळा/महाविद्यालये यांच्याशी भागीदारी - तसे प्रशिक्षण वर्ग
 • एकेका उद्योग क्षेत्रातील संस्थेबरोबर करार, तिथे जवळपास असलेले उद्योगांना CSR मधून मदत करण्याची व्यवस्था, तिथली आर्थिक व्यवस्था शासकीय मदतीपेक्षा येणारे लोक जी फी देतील ती घेऊन स्वतंत्र
 • महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या रचनेशी संबंध ठेवून याचा आंतरराष्ट्रीय प्रचार
 • महाराष्ट्रात विशेष बस सर्कीट करून एका फेरीत महत्वाची संग्रहालयं / संस्कृती मंदिरे पहाण्याची सोय

Copyright © 2014 Maharashtra Navnirman Sena, Rajgad, Mumbai. All rights reserved.