मराठी अस्मिता

मराठी माणसाचा महाराष्ट्र!

आपल्या भाषेतून, वागण्यातून, प्रत्येक व्यवहारातून आपली मराठी ओळख पक्की करण्यासाठी करायचे प्रयत्न

महाराष्ट्र हा मराठी माणसासाठी, मराठी समाजासाठीच आहे. आपली मराठी ओळख आपल्या राज्यातच पुसली गेली तर मराठी माणूस, मराठी समाज हा इतिहासजमा होईल. आपण व्यक्ती म्हणून नक्कीच जगू, यशस्वी होऊ; पण आपल्यातला मराठीपणा, आपली मूळ ओळख नष्ट होईल. आपण स्वत:पासून हरवून जाऊ.

आज जगात कित्येक समूह आहेत, ज्यांची ओळख केवळ त्यांची भाषा संपल्यामुळे पुसली गेली. ते समूह संपले, जगाच्या पटलावरून नाहीसे झाले. आपले तसे व्हायला नकोच; उलट महाराष्ट्राने प्रगती करावी, अनेक क्षेत्रात जगाचे नेतृत्व करावे हे स्वप्न उराशी बाळगले. आणि भाषा व आपला काय संबंध आहे याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. जे समूह नष्ट झाले त्यांचे नेमके काय झाले, तसे का झाले हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि भाशा, आपली ओळख, आणि ती पक्की असल्यावर समाजाची होणारी प्रगती यांचा परस्परसंबंध लक्षात आला.

तो महाराष्ट्रासमोर तेवढ्याच स्पष्टपणे मांडण्याची संधी आम्ही इथे घेत आहोत. आणि महाराष्ट्राची मराठी ओळख पक्की करण्यासाठी काय करावे लागेल हे ही स्पष्ट करत आहोत.


Copyright © 2014 Maharashtra Navnirman Sena, Rajgad, Mumbai. All rights reserved.