ब्लुप्रिंट बनवण्याच्या प्रक्रियेदरम्यान, विषय अधिक खोलात जाऊन समजून घेताना, तर कधी एखाद्या बातमी वा घटनेला अभ्यास करताना, महाराष्ट्रासमोरच्या आव्हानांच्या व्याप्तीचा अंदाज आला. जगात आज काय विचार होत आहेत हे समजले. महत्वाचे म्हणजे महाराष्ट्राची ब्लुप्रिंट बनवताना विचार कसा करायचा हे कळले. उदा. विजेचे संकट केवळ नवीन वीज निर्मिती प्रकल्पांची आखणी करण्यापुरते मर्यादित राहिले नाही तर विजेचा प्रश्न पर्यावरणाशी, आपल्या जीवनशैलीशी कसा जोडायला हवा हे समजले.
अभ्यास करता करता काही लिखाण झाले ते आम्ही आपल्यासमोर ठेवत आहोत.